महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड कोरोना अपडेट, जिल्ह्यात रविवारी 233 कोरोनाबाधितांची नोंद

जिल्ह्यात रविवारी प्राप्त झालेल्या 1 हजार 532 अहवालांपैकी 233 अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 141 तर अँटिजेन तपासणीद्वारे 92 अहवालांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 86 हजार 949 वर पोहोचली असून, यातील 81 हजार 539 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

By

Published : May 16, 2021, 8:52 PM IST

नांदेड कोरोना अपडेट
नांदेड कोरोना अपडेट

नांदेड -जिल्ह्यात रविवारी प्राप्त झालेल्या 1 हजार 532 अहवालांपैकी 233 अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 141 तर अँटिजेन तपासणीद्वारे 92 अहवालांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 86 हजार 949 वर पोहोचली असून, यातील 81 हजार 539 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

गेल्या तीन दिवसांत 10 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद

दिनांक 14,15 व 16 मे या तीन दिवसांच्या कालावधीत एकूण 10 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोमुळे मृत्यू झालेल्यांचा एकूण आकडा हा 1 हजार 804 वर पोहोचला आहे. जिल्ह्यात सध्या 3 हजार 235 कोरोनाचे सक्रिय रुग्ण असून, त्यापैकी 128 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

उपलब्ध असलेल्या बेडची संख्या

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 67, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 82, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 65, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये 32 बेड सध्या स्थितीमध्ये उपलब्ध आहेत.

जिल्ह्यातील कोरोना स्थितीची संक्षिप्त माहिती

एकूण घेतलेले स्वॅब- 4 लाख 98 हजार 116
एकूण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 890
एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 86 हजार 949
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 81 हजार 539
एकूण मृत्यू संख्या-1 हजार 804
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.77 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-36
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-225
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 235
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले रुग्ण -128

हेही वाचा -'फडणवीसांनी सोनिया गांधींना पत्र लिहून महाराष्ट्राबाबत खोटी माहिती पसरवली'

ABOUT THE AUTHOR

...view details