नांदेड- बहुचर्चित कृष्णुर धान्य घोटाळा प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने जिल्हा पुरवठा विभागातील चार कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. त्या कर्मचाऱ्यांना नायगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नांदेडमधील कृष्णुर धान्य घोटाळा प्रकरणातील कर्मचार्यांना पोलीस कोठडी - जिल्हा पुरवठा विभाग
कृष्णुर धान्य घोटाळा प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने जिल्हा पुरवठा विभागातील चार कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. त्या कर्मचाऱ्यांना नायगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सरकारी धान्य घोटाळा प्रकरणात जिल्हा पुरवठा विभागातील अव्वल कारकून रमेश भोसले, रत्नाकर ठाकुर तसेच मुक्रमाबादचे गोदामपाल इस्माजी बीपत्तल व हदगावचे विजय शिंदे या ४ जणांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने १ जून रोजी रात्री अटक केली होती. या ४ जणांना नायगाव न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायाधीश डोरणापल्ले यांनी या चौघांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, शासकीय धान्याचा हा कोट्यावधीचा घोटाळा प्रशासनातील अधिकार्यांच्या संगनमतानेच शक्य आहे. त्यामुळे या घोटाळ्याचे मुख्य सुत्रधार असणार्या प्रशासनातील अधिकार्यांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणातील दोषी कर्मचार्यांना ताब्यात घेण्याबरोबरच पुरवठा विभागात किंवा उच्च पदावर कार्यरत अधिकार्यांची चौकशी करावी, असे बोलले जात आहे, तर अशी मागणी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी यापूर्वी देखील केली आहे.