नांदेड -पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरुन एका तरुणावर तलवारीने वार करत मारहाण करण्यात आली. नांदेड शहरातील पंचशील चौक, गोविंदनगर भागात ही घटना घडली.
मेकॅनिक असलेल्या तन्वीर खान सिकंदर खान (वय,१९) याला पोलिसांचा खबऱ्या आहे म्हणून आरोपी नागेश गायकवाड (रा.लक्ष्मीनगर, नांदेड) याने शिविगाळ केली. तन्वीरच्या मनगटावर आणि पायावर तलवारीने वार करून जिवे मारण्याची धमकी दिली.