नांदेड - शहरात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आज शनिवारी सकाळी तब्बल १८ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ८४ वर पोहोचली आहे.
नांदेडमध्ये शनिवारी १८ रुग्णांची भर, एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ८४ वर - नांदेड कोरोना अपडेट
काही दिवसांपूर्वी ग्रीन झोनमध्ये असलेल्या नांदेडमध्ये कोरोनाने अगदी झपाट्याने पाय पसरायला सुरुवात केली आहे. पाहता पाहता कोरोनाबाधितांचा आकडा ८४ वर पोहोचला आहे, तर ५ जणांना मृत्यू देखील झाला आहे.
आज आढळलेल्या नवीन रुग्णांमध्ये १३ रुग्ण प्रवासी आहेत. चार रुग्ण करबला भागातील आहेत, तर १ रुग्ण कुंभार गल्लीमधील सराफा परिसरातील असून तो शासकीय आयुर्वेद रुग्णलायत दाखल आहे.
काही दिवसांपूर्वी ग्रीन झोनमध्ये असलेल्या नांदेडमध्ये कोरोनाने अगदी झपाट्याने पाय पसरायला सुरुवात केली आहे. पाहता पाहता कोरोनाबाधितांचा आकडा ८४ वर पोहोचला आहे, तर ५ जणांना मृत्यू देखील झाला आहे. आतापर्यंत २६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून ५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दोघे जण अद्यापही फरार असून त्यांचा शोध घेणे सुरू आहे.