नांदेड -जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 3 हजार 179 अहवालापैकी 177 अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. आरटीपीसीआर तपासणीद्वारे 95 तर अँटिजेन तपासणीद्वारे 82 जणांचे अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 89 हजार 697 एवढी झाली असून यातील 86 हजार 137 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. सध्या स्थितीत 1 हजार 187 रुग्ण उपचार घेत असून 34 बाधितांची प्रकृती अतिगंभीर स्वरूपाची आहे.
पाच जणांचा मृत्यू
नांदेड कोरोना अपडेट : जिल्ह्यात 177 बाधित,5 मृत्यू, 281 बाधित झाले बरे - nanded corona news
जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 3 हजार 179 अहवालापैकी 177 अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. रटीपीसीआर तपासणीद्वारे 95 तर अँटिजेन तपासणीद्वारे 82 जणांचे अहवाल बाधित आले आहेत.
दि. 31 मे रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी येथे उमरी येथील 25 वर्षाचा पुरुष, अर्धापूर तालुक्यातील 77 वर्षाचा पुरुष, तर 1 जून रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे बिलोली येथील 65 वर्षाची महिला तर सिडको नांदेड येथील 45 वर्षाचा पुरुष, गाडीपुरा नांदेड येथील 65 वर्षाची महिला यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 889 एवढी आहे.
उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 123, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 115 खाटा उपलब्ध आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती....
एकूण घेतलेले स्वॅब- 5 लाख 43 हजार 311
एकूण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 42 हजार 517
एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 89 हजार 697
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 86 हजार 137
एकूण मृत्यू संख्या-1 हजार 889
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.03 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-6
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-113
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-179
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 187
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-34