नांदेड -जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 150 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 92 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाच्या निदानासाठी 1 हजार 318 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा हा 24 हजार 309 वर पोहोचला आहे. त्यापैकी 22 हजार 704 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या जिल्ह्यात एकूण 785 कोरोनाबाधितांवर उपचास सुरू असून, त्यातील 23 जणांची प्रकृती गंभीर आहे.
देगलूर येथील महिलेचा मृत्यू
शनिवार 6 मार्च 2021 रोजी सिद्धार्थनगर देगलूर येथील 65 वर्षांच्या एका महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत 605 जणांना आपला जीव गमावा लागला आहे.