नांदेड -नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील ( Nanded North Assembly Constituency ) रस्ते विकासासाठी आवश्यक असणारा निधी खेचून आणण्याच्या अनुषंगाने आमदार बालाजी कल्याणकर ( MLA Balaji Kalyankar ) यांनी षटकार ठोकला आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे आमदार बालाजी कल्याणकर यांनी या भागातील रस्ते विकासासाठी तब्बल 780 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. तर, नांदेड उत्तर वळण रस्त्यासाठी 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे.
नांदेड उत्तर वळण रस्त्यासाठी 150 कोटी रुपये मंजूर; शहरातील रस्ते विकासासाठी 52 कोटी
बालाजी कल्याणकर ( MLA Balaji Kalyankar ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्याकडून नांदेड उत्तर वळण रस्त्यासाठी 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. तसेच या भागातील रस्ते विकासासाठी ( Road development ) तब्बल 780 कोटी रुपयांच्या निधीची मागणी आमदार बालाजी कल्याणकर यांनी केली आहे.
शिवाय नांदेड शहरात सुरू असलेल्या रस्ते विकास कामासाठी ( Road development ) तातडीने 52 कोटी रुपये मंजूर करून घेतले आहेत .याशिवाय हिंगोलीकडे वर्ग करण्यात आलेली दोन अत्यंत महत्त्वाची कामे सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेडकडे ( Public Works Department Nanded ) पुन्हा खेचून आणण्यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बजावून सांगत आमदार बालाजी कल्याणकर यांची कामे प्राधान्य करा. असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील रस्ते विकासाची कामे आता सुसाटपणे पूर्ण होणार आहेत. नांदेड उत्तर मतदार संघात 2020 मार्चच्या अर्थसंकल्पात नांदेड शहरासाठी 65 कोटी उत्तरी वळण रस्ता मंजूर करण्यात आला होता. परंतु भूसंपादना साठी 65 कोटी रुपये खर्च करण्यात आले. उत्तरी वळण रस्त्यासाठी निधीची कमतरता असून सदरील निधी पुढील अर्थसंकल्पात मंजूर करावा अशी मागणी आ. बालाजी कल्याणकर यांनी केली.