नांदेड-महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ 'ड'च्या पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. पोटनिवडणुकीसाठी एकूण १५ अर्ज दाखल झाले असून आज (बुधवारी) याची छाननी करण्यात आली आहे.
नांदेड महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीसाठी १५ अर्ज दाखल - नांदेड निवडणूक बातमी
गुरू गोविंदसिंघजी स्टेडियम परिसरात असलेल्या निवडणूक कार्यालयात मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. अब्दुल गफार (काँग्रेस), एकनाथ गरुडकर (शिवसेना), साबेर चाऊस (एमआयएम) यांच्यासह १५ जणांनी अर्ज दाखल केले आहेत.
हेही वाचा-नांदेड : अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी चारही शिक्षक निलंबित
गुरू गोविंदसिंघजी स्टेडियम परिसरात असलेल्या निवडणूक कार्यालयात मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यानंतर अब्दुल गफार (काँग्रेस), एकनाथ गरुडकर (शिवसेना), साबेर चाऊस (एमआयएम) यांच्यासह १५ जणांनी अर्ज दाखल केले आहेत.
या अर्जाची छाननी बुधवारी करण्यात आली. यात सर्व अर्ज वैध ठरले आहेत. उमेदवारी अर्ज शुक्रवारपर्यंत (दि.२४) मागे घेता येणार आहेत. त्यानंतर निवडणूक चिन्ह (दि.२५) जानेवारीला देऊन निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी त्याच दिवशी प्रसिद्ध होणार आहे. या निवडणुकीसाठी (दि.६) फेब्रुवारीला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार असून मतमोजणी (दि.७) फेब्रुवारीला होणार आहे.