नांदेड 3 लेकरं आणि वयस्कर सासरे यांची एकाएकी जबाबदारी पडलेल्या रेणुका गोटमवाड यांचे डोळेही काळजीनं काळवंडले होते. अडीच एकरातल्या सोयाबीनसाठी आणलेल्या कीटकनाशकानंच त्यांचे पती राजू गोटमवाड यांनी स्वत:चा शेवट केला. त्यांना जी चिंता सतावत होती, ती आता सतावतेय, शून्यात बघत 36 वर्षांच्या रेणुकाताई सांगत होते. Farmers Suicide यावेळी सोयाबीन झालं की सावकाराकडून 4 टक्के महिन्यानं घेतलेलं कर्ज फेडण्याचा त्यांचा विचार होता. 137 Farmers Suicide In Nanded District In 2 month पण फाटलेल्या आभाळानं उभ्या पिकाचा चिखल केला आणि राजू यांचाही धीर सुटला.
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील गेल्या दीड महिन्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या येथे झाल्या आहेत. साधारणपणे अडीच ते तीन एकर जमीनधारणा क्षेत्र असलेला हा तालुका आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून यंदा राज्यात सर्वाधिक आत्महत्या येथील आहेत. 5 एकरांच्या शेताचं तळं झालेलं मुलगा दाखवत होता. 15 दिवस उलटले तरी शेतातलं पाणी सुकलं नव्हतं. याच पाण्यानं धास्तावलेल्या सुरेश मानेंनी पिकासाठी आणलेलं औषध पिऊन आपली जीवनयात्रा संपवली. 15 वर्षांचे जुळे प्रथमेश आणि प्रतीक आणि 10 वर्षांचा प्रणव या 3 लेकरांना माघारी सोडून. 137 Farmers Suicide In Nanded District In 2 month त्यांच्यावर एसबीआयचं दीड लाखाचं, सोसायटीचं पावणेदोन लाखांचं आणि बचत गटाचं 2 लाखांचं कर्ज असल्याचं त्यांचे बंधू सुभाष माने सांगत होते. त्यांच्या घराशेजारीच एक आलिशान महाल वाकुल्या दाखवत होता.
या महालाजवळच सुरेश मानेंनी आत्महत्या केलीआमचे एकत्र कुटुंब आहे. घराचा सर्व कारभार सुरेशरावांकडेच होता. त्यांना १० एकर जमीन आहे. घरची सर्वच मंडळी शेतात राबणारी होती. मागील वर्षी सर्व पिके वाहून गेली होते. त्यामुळे सोसायटीचे १.६० लाख, स्टेट बँक ऑफ इंडियाकडून पावणेदोन लाख आणि खासगी बचत गटाकडून २ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्ज भरण्यासाठी सोयायटीच्या नोटिसा येत होते. बचत गटातील पैसे घेऊन आधीच्या काही सावकारांचे देणे दिले होते. जुलैचा पूर्ण महिना आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात रोज तुफान पाऊस झाला. या पावसात सोयाबीन पिवळे पडले आणि पाने गळू लागली. उत्पन्नाचा अन्य काही मार्ग नाही. पीक हातचे गेले होते. सुरेशराव संध्याकाळी शेतात आखाड्यावर झोपायला गेले ते परत आलेच नाहीत. त्यांचे बंधू सुभाष माने सांगत होते. 137 Farmers Suicide In Nanded District In 2 month या कुटुंबाची १० एकर जमीन आहे. कर्ज फेडण्यासाठी त्यांना ती विकायची आहे. पण खरेदीसाठी गावात कुणाजवळच पैसे नसल्याचे ते सांगत होते. आमच्यासारखीच परिस्थिती अख्ख्या गावाची झाली होती. शासनाने आता हेक्टरी १३५०० रुपये मदत जाहीर केली आहे. पण, प्रत्यक्षात एका हेक्टरसाठी २५ हजारांचा खर्च झाला होता. उधारी, उसनवारी करून जे पैसे गुंतवले ते पण फेडता येत नव्हते. ते हिशोब मांडत होते.
पावसामुळे शेतात पाय ठेवणं अवघडयाच तालुक्यातील पारवा गावच्या रेणुका गोटमवाड यांची परिस्थिती तर याहून बिकट होती. 2 मुली, 1 मुलगा आणि वृद्ध सासरे मागे सोडून त्यांचे पती राजू गोटमवाड यांनी १४ जुलैला आत्महत्या केली. रेणुका सांगत होते की, घरची अडीच एकर शेती होती. मागील वर्षी परतीच्या पावसात हातातोंडाशी आलेले सोयाबीन वाहून गेले. खासगी सावकाराकडून ४ टक्के महिन्यानं 2 लाख रुपये घेतले. यंदाच्या पिकावर हे २ लाख फिटतील, ही आशा होती. मात्र, महिनाभर झालेल्या अतिपावसामुळे पीक पूर्णपणे वाया गेले आहे. सोयाबीनला टाकण्यासाठी खत आणले होते. कीटकनाशक आणले होते. पण, एकसारख्या पावसामुळे शेतात पाय ठेवणं अवघड होतं. खत, कीटकनाशक तसेच घरात पडून राहिले. एक दिवस पावसाने उघडीप दिली आणि पती सकाळीच उठून शेतात पाहणी करायला गेले. 137 Farmers Suicide In Nanded District In 2 month सोयाबीनच्या नुसत्या काड्या झालेल्या होते. शेतातून घरी आले आणि बाजूच्या खोलीत जाऊन सोयाबीनला फवारणीसाठी आणलेलं अर्धा लिटर कीटकनाशक पिऊन पडले. ज्या चिंतेनं पती गिळला, तीच चिंता भेडसावत आहे. सावकाराचे कर्ज कसे फेडू, लेकीचं लग्न कसं करू, घरखर्चासाठी पैसे कुठून आणू ? त्यांच्या प्रश्नांचं उत्तर आज तरी कुणाजवळ नाही. म्हातारे वडील कळवळून सांगत होते. जून महिना पावसाविना गेला. पाऊस पडेल, या आशेवर दीड एकरात सोयाबीन आणि एक एकर कापूस लावला होता. पण, जूनमध्ये पाऊस पडला नाही. जुलैमध्ये दुबार पेरणी केली.