नांदेडमध्ये 132 कोरोना बाधितांची नोंद, 340 बाधित झाले बरे - nanded cororna update
जिल्ह्यात गुरुवारी प्राप्त झालेल्या 3 हजार 66 अहवालापैकी 132 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 89 हजार 986 झाली असून यातील 86 हजार 800 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यात 799 रुग्ण उपचार घेत आहे.
नांदेड -जिल्ह्यात गुरुवारी प्राप्त झालेल्या 3 हजार 66 अहवालापैकी 132 अहवाल पॅझिटिव्ह आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 67 तर अँटिजेन तपासणीद्वारे 65 अहवाल पॅझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 89 हजार 986 झाली असून यातील 86 हजार 800 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यात 799 रुग्ण उपचार घेत असून 25 बाधितांची प्रकृती अतिगंभीर स्वरुपाची आहे.तर जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 890 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातसध्या 799 रुग्णावर उपचार सुरु
सध्या स्थितीत जिल्ह्यात 799 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 13, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 3, जिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालय (नवी इमारत) 37, माहूर कोविड केअर सेंटर 17, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 25, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 8, देगलूर कोविड रुग्णालय 8, नायगाव कोविड केअर सेंटर 1, उमरी कोविड केअर सेंटर 1, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 4, लोहा कोविड रुग्णालय 6, भोकर कोविड केअर सेंटर 1, देगलूर कोविड रुगणालय 7, बिलोली कोविड केअर सेंअर 6, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 381, जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 216, खाजगी रुग्णालय 73 व्यक्ती उपचार घेत आहेत.
जिल्ह्यातउपलब्ध असलेल्या खाटांची संख्या
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 122, जिल्हा रुग्णालय कोविड विभाग येथे 118 खाटा उपलब्ध आहेत.
जिल्ह्यातील कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
एकूण घेतलेले स्वॅब- 5 लाख 49 हजार 844
एकूण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 48 हजार 643
एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 89 हजार 986
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 86 हजार 800
एकूण मृत्यू संख्या- 1 हजार 890
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.45 टक्के
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- निरंक
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-23
प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-183
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 799
अतिगंभीर प्रकृती असलेले रुग्ण-25