नांदेड -जिल्ह्यामध्ये आज प्राप्त झालेल्या 5 हजार 665 अहवालांपैकी 1 हजार 287 जणांचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 729 तर अँटिजेन तपासणीद्वारे 558 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 67 हजार 887 वर पोहोचली आहे. यातील 52 हजार 541 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 16 ते 18 एप्रिलदरम्यान कोरोनामुळे 27 व्यक्तींचा मृत्यू झाला असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 1 हजार 257 एवढी झाली आहे.
उपलब्ध असलेल्या बेडची संख्या
सध्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, रुग्णांना बेड मिळून देण्यासाठी नातेवाईकांची धावाधाव होत आहे. दरम्यान जिल्ह्यात सध्यास्थितीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 20, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 12, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 17 बेड उपलब्ध आहेत.
जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती