महाराष्ट्र

maharashtra

नांदेड जिल्ह्यात बुधवारी 1255 नवे कोरोनाबाधित; 26 जणांचा मृत्यू

By

Published : Apr 8, 2021, 2:32 AM IST

नांदेड जिल्ह्यात बुधवारी प्राप्त झालेल्या 4 हजार 534 अहवालापैकी 1 हजार 255 अहवाल कोरोनाबाधित आले आहेत.

nanded hospital
नांदेड रुग्णालय

नांदेड - जिल्ह्यात बुधवारी प्राप्त झालेल्या 4 हजार 534 अहवालापैकी 1 हजार 255 अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 506 तर अँटिजेन तपासणीद्वारे 749 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या 50 हजार 892 एवढी झाली असून यातील 38 हजार 891 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 10 हजार 783 रुग्ण उपचार घेत असून 189 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. 3 ते 6 एप्रिल या चार दिवसांच्या कालावधीत 26 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 970 एवढी झाली आहे.

हेही वाचा -ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध आदेश लागू

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 3 लाख 49 हजार 593
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 91 हजार 624
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 50 हजार 892
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 38 हजार 891
एकुण मृत्यू संख्या-970
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.41 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-7
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-58
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-384
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-10 हजार 783
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-189.

हेही वाचा -लसीच्या तुटवड्यानंतर पालिकेला जाग; कांजूर लस साठवणूक केंद्राचे उद्घाटन

ABOUT THE AUTHOR

...view details