महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमधील 123 शिक्षकांची मुख्याध्यापकपदी बढती - सेवा जेष्ठता यादी

पदोन्नत शिक्षकांना रिक्त असलेल्या जागांवर मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती देण्यात आली. बिंदू नामावली, सेवा ज्येष्ठता यादी, आचार संहिता, अशा विविध कारणांने शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न 2016 पासून प्रलंबित होता. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी वेळोवेळी आढावा घेतला होता.

नांदेडमधील 123 शिक्षकांची मुख्याध्यापकपदी बढती

By

Published : Aug 11, 2019, 10:03 AM IST

नांदेड - जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील 123 प्राथमिक शिक्षक पदोन्नतीने मुख्याध्यापक झाले आहेत. 10 ऑगस्टला जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.

नांदेडमधील 123 शिक्षकांची मुख्याध्यापकपदी बढती

यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती माधवराव मिसाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, जिल्हा परिषद सदस्य अॅड. रामराव नाईक, शिक्षणाणिकारी (मा) बी.आर. कुंडगीर, शिक्षणाधिकारी (प्रा) प्रशांत दिग्रसकर, मनपाचे शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, उप शिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर उपस्थित होते.

अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न निकाली काढल्यामुळे अनेक शिक्षक व शिक्षण संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी जीवन वडजे, देवीदास बसवदे, नीलकंठ चोंडेसह विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details