नांदेड -कधी दुष्काळाने तर कधी अतिवृष्टीने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये 2019 या वर्षात 122 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. 2018 मध्ये 98 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होता. यावर्षी हा आकडा 24 ने वाढला आहे.
सततचा ओला आणि कोरडा दुष्काळ, कर्जाचा वाढणारा डोंगर, पिकांचे नुकसान यामुळे शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबत आहेत. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनस्तरावर अनेक उपाययोजना केल्या जातात. मात्र, तरीही शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत. ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर शेतकरी आत्महत्या वाढल्या.
हेही वाचा - सत्ता गेल्याने विरोधकांची अवस्था पाण्याबाहेर पडलेल्या माशा सारखी, बाळासाहेब थोरातांचा टोला