नांदेड- एकीकडे निवडणूक आयोगाकडून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. मात्र, नांदेड लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तात आलेले नांदेड जिल्ह्यातील तब्बल १ हजार २०० होमगार्ड मतदानापासून वंचित राहिले असल्याचे समोर आले आहे.
नांदेड जिल्ह्यातील तब्बल १२०० होमगार्ड मतदानापासून वंचित
नांदेड लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तात आलेले नांदेड जिल्ह्यातील तब्बल १ हजार २०० होमगार्ड मतदानापासून वंचित राहिले असल्याचे समोर आले आहे. मतदान केंद्रावर ड्युटी लागल्याने त्यांना मतदान करता आले नाही.
लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्रावर ड्युटी लागलेल्या होमगार्डांना टपाली मतदान करण्याचा अधिकार मिळाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण १ हजार २०० होमगार्ड मतदार मतदानापासून वंचित राहिले आहेत. राज्यातील अनेक भागातील शेकडो होमगार्डसना मतदान केंद्रावर ड्युटी लागल्याने मतदान करता आले नाही.
टपाल मतदानाची आम्ही अधिकाऱ्यांकडे मागणी केली होती. परंतु, त्यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही. अधिकाऱ्यांच्या सुरक्षेमुळे आम्ही मतदानापासून वंचित राहिलो असल्याचा आरोप होमगार्डसनी केला आहे.