महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमध्ये गोवा बनावटीची 12 लाखांची अवैध दारू जप्त, ५ जणांना अटक - नांदेड-लोहा मार्ग बातमी

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने नांदेड-लोहा मार्गावर एक संशयित कार तपासली असता त्यामध्ये अवैध दारू सापडली.

नांदेडमध्ये गोवा बनावटीची अवैध दारू जप्त

By

Published : Sep 28, 2019, 7:38 PM IST

नांदेड - राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज (शनिवारी) नांदेड-लोहा मार्गावर गोवा बनावटीची 12 लाख रुपयांची अवैध दारू जप्त केली. एका कारमधून या दारूची वाहतूक केली जात होती. या प्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली आहे.

नांदेडमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोवा बनावटीची अवैध दारू केली जप्त

हेही वाचा -यवतमाळमधील बिबी गावच्या महिलांचा दुर्गावतार; गावठी हातभट्टीवर टाकली धाड

जिल्ह्यात गोवा बनावटीची दारू अवैधरित्या विकली जात होती. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी नांदेड-लोहा मार्गावर एक संशयित कार तपासली असता कारमध्ये अवैध दारू सापडली. घटनेचा पुढील तपास उत्पादन शुल्कचे पथक करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details