महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रदेश भाजपाची नवी कार्यकारिणी, चंद्रकांत दादांच्या टिममध्ये नांदेडच्या अकरा जणांना संधी! - maharashtra BJP working committee

महाराष्ट्र प्रदेश भाजपने पक्षाच्या नव्या कार्यकारिणी समितीची घोषणा केली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या नव्या टिममध्ये जिल्ह्यातील अकरा जणांना संधी मिळाली आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

maharashtra BJP working committee
प्रदेश भाजपाची नवी कार्यकारिणी, चंद्रकांत दादांच्या टिममध्ये नांदेडच्या अकरा जणांना संधी!

By

Published : Jul 4, 2020, 1:25 PM IST

नांदेड - महाराष्ट्र प्रदेश भाजपने पक्षाच्या नव्या कार्यकारिणी समितीची घोषणा केली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या नव्या टिममध्ये जिल्ह्यातील अकरा जणांना संधी मिळाली आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी मंत्री डॉ.माधवराव किन्हाळकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, महानगराचे माजी अध्यक्ष संतुकराव हंबर्डे, अॅड. चेतन्यबापू देशमुख, दिलीप कंदकुर्ते, संजय कौडगे, माजी महापौर अजयसिंह बिसेन, सुधाकर भोयर, संध्या राठोड यांचा प्रदेश कार्यकारिणीत समावेश करण्यात आलाय.

राज्यात शिवसेना- काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर भारतीय जनता पार्टी विरोधी बाकावर बसली आहे. राज्यात सर्वाधिक जागा निवडून आल्यानंतर देखील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाची भूमिका भाजपच्या वाट्याला आली. त्यामुळे संघटनात्मक पातळीवर पक्षाची जबाबदारी आणखी वाढली आहे. जनतेचे प्रश्न घेऊन पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारविरुद्ध आवाज उठवतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या नव्या टिममध्ये नांदेडमधून तब्बल अकरा जणांना संधी मिळाली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या जिल्ह्यात भाजपच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून झाल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांना पराभूत करून प्रतापराव पाटील चिखलीकर निवडून आले. याव्यतिरिक्त मुखेड मतदारसंघातून डॉ.तुषार राठोड तर किनवट मतदारसंघातून भिमराव केराम असे दोन आमदार भाजपाच्या तिकीटावर निवडून आले. तसेच राम पाटील रातोळीकर यांच्या माध्यमातून पक्षाने नांदेडला विधान परिषदेवरही संधी दिली. त्यामुळे खासदार चिखलीकर तसेच वरील सर्व आमदारांच्या मदतीला संघटनात्मक पातळीवर काम करण्यासाठी आता चंद्रकांतदादांच्या टिममधील खेळाडू किती सक्षमपणे काम करतात, याकडे नांदेडकरांचे लक्ष लागले आहे.

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर पक्षातील अनुभवी व ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. याआधी त्यांनी रावसाहेब दानवे यांच्या अंतर्गत प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली आहे. याशिवाय अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर यांनाही पक्षाने प्रदेश कार्यकारिणीवर घेतले आहे . माजी आमदार तथा धडाडीचे कार्यकर्ते ओमप्रकाश पोकर्णा तसेच अॅड. चैतन्यबापू देशमुख यांनाही कार्यकारिणीवर स्थान मिळाले आहे. चैतन्यबापू सलग दुसऱ्यांदा प्रदेश कार्यकारिणीवर गेले आहेत. माजी महानगर अध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे तसेच नांदेड दक्षिण मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवलेले दिलीप कंदकुर्ते, पक्षाचे जुने कार्यकर्ते संजय कौडगे, माजी महापौर अजयसिंह बिसेन, किनवटचे सुधाकर भोयर व महिला प्रतिनिधी संध्या राठोड यांना पक्षाच्या कार्यकारिणीवर काम करण्याची संधी मिळाली आहे.

नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवार अजित गोपछडे यांना माघार घ्यावी लागली होती. मात्र त्यांची भाजप वैद्यकीय आघाडीच्या (चिकित्सा प्रकोष्ठ) प्रदेशाध्यक्षपदी फेर निवड झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details