नांदेड - धर्माबाद शहरातील सरस्वती नगर मधील महिलेची गळा चिरून हत्या घडल्याची घटना काल शुक्रवारी (१३ मार्च) घडल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. तसेच तपासाचे आव्हानही पोलिसांपुढे होते. याप्रकरणी तपासाची चक्रे गतीमान करत पोलीस निरीक्षक सोहन माच्छरे यांनी या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीस २४ तासाच्या आत जेरबंद केले आहे.
धर्माबाद येथील 'त्या' महिलेच्या हत्येचा २४ तासात छडा, आरोपी अटक हेही वाचा -हत्या करुन घराला कुलूप लावले, 11 दिवसानंतर घटना उघडकीस
सदरील आरोपीस धर्माबादच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. धर्माबाद शहरातील सरस्वती नगर येथील सुनीताबाई नागोराव सूर्यवंशी वय ५५ या महिलेचा सुमारे १० दिवसापुर्वी धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आला होती. परिसरात दुर्गंधी सुटल्यावर १२ मार्च रोजी पोलिसांनी ही माहिती मिळाली. त्यानंतर घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी भेट देऊन आवश्यक सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झालेले सोहन माच्छरे यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर प्रकरणातील मुख्य आरोपी रमेश वडनम गंगाधर, महागाव मंडळ म्हैसा जिल्हा निर्मल याला अवघ्या २४ तासाच जेरबंद केले.
सदरील प्रकरण हे पैशाच्या देवाणघेवाण व्यवहारातून घडल्याचे प्रथम दर्शनी समोर आले आहे. आरोपीस १७ मार्च पर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याने प्रकरणातील उर्वरित सत्य ही समोर येईल, असे सोहन माच्छरे यांनी सांगितले.
हेही वाचा -मनोरुग्ण तरुणीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी