महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक; मोस्ट वॉन्टेड झाम बिल्डरला अटक - Zam builder arrested

हेमंत सिकंदर झाम बिल्डरने 2010 मध्ये हिंगण्याच्या वागधरा भागातील 30 एकर जागेवर कन्हैया सिटी तयार करण्याची जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्या जागेवर थोडे-फार निर्माण कार्य केल्यामुळे शेकडो नागरिकांनी तिथे घर घेण्यासाठी आपल्या आयुष्यभराची संपूर्ण जमा-पुंजी झाम बिल्डरकडे सोपवली होती.

झाम बिल्डरला 3 वर्षांनंतर अटक

By

Published : Sep 15, 2019, 1:03 PM IST

नागपूर- स्वस्त आणि आलिशान घर देण्याचे आमिष दाखवून हजारो नागरिकांची फसवणूक करणाऱ्या झाम बिल्डरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हेमंत सिकंदर झाम, असे या बिल्डरचे पूर्ण नाव आहे. झाम बिल्डर विरुद्ध 400 पेक्षा जास्त नागरिकांनी फसवणुकीची तक्रार केली आहे. गेल्या 3 वर्षांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. पण, तो मिळून येत नव्हता. ग्राहक न्यायालयानेही त्याच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते.

मोस्ट वॉन्टेड झाम बिल्डरला अटक

हेही वाचा - पाकिस्तानातील गुरूद्वारा श्री ननकाना साहिब येथून निघालेल्या नगर किर्तनचे नागपुरात आगमन

हेमंत सिकंदर झाम बिल्डरने 2010 मध्ये हिंगण्याच्या वागधरा भागातील 30 एकर जागेवर कन्हैया सिटी तयार करण्याची जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्या जागेवर थोडे-फार निर्माण कार्य केल्यामुळे शेकडो नागरिकांनी तिथे घर घेण्यासाठी आपल्या आयुष्यभराची संपूर्ण जमा-पुंजी झाम बिल्डरकडे सोपवली होती. नागरिकांकडून रक्कम घेताना त्याने घर देण्याचा दिलेला अवधी निघून गेला. पण, कुणालाही घर मिळाले नसल्याने गुंतवणूकदारांनी पैसे परत मागण्याचा तगादा लावल्याने तो पळून गेला होता.

हेही वाचा - भाजप पदाधिकाऱ्यांच्या विरोधात सिल्लेवाडा महिला सरपंचांची पोलिसांत तक्रार

बिल्डर गुंतवणूकदारांचे पैसे घेऊन पळाल्याने 400 पेक्षा जास्त गुंतवणूकदारांनी त्याच्याविरुद्ध ग्राहक मंचात तक्रार नोंदविली तर काहींनी पोलिसांत तक्रार नोंदविली. तक्रारींची संख्या वाढल्याने हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले होते. दरम्यान, 3 वर्षांपासून झाम बिल्डर पोलिसांना सापडून येत नव्हता. झाम बिल्डर हा सोनेगावमधील साईनगरात राहत असल्याचे समजताच पोलिसांनी बिल्डिंगवर धाड टाकत झामला अटक केली.

ABOUT THE AUTHOR

...view details