नागपूर - एका युवकाने जळत्या चितेवर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील जयताळा परिसरात घडली. आत्महत्या केलेला युवक मनोरुग्ण असून, त्याला दारुचे व्यसन होते. महेश कोटांगले असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
थरारक ! जळत्या चितेवर उडी घेऊन युवकाची आत्महत्या - youth
एका युवकाने जळत्या चितेवर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील जयताळा परिसरात घडली. आत्महत्या केलेला युवक मनोरुग्ण असून, त्याला दारुचे व्यसन होते.

काल सायंकाळी (शनिवार) स्मशानभूमीत वयोवृद्ध महिला पार्वतीबाई बनकर नावाच्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे सगळे नातेवाईक तिथून निघून गेले. त्यानंतर महेश तिथे आला आणि त्याने जळत्या चिंतेत उडी घेऊन आपले जीवन संपवले. जवळच खेळत असलेल्या लहान मुलांना हा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी आरडाओरड केली. पोलिसांनी त्याला रुग्णालयात पोहचविले मात्र, तो पूर्णपणे भाजल्याने त्याचा मृत्यू झाला.
ज्या वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला त्याचा आणि मृत महेशचा काहीही संबंध नव्हता. महेश मनोरुग्ण असल्याने त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.