नागपूर- शहरासह जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कन्हान नदीला पूर आला आहे. या पुरामध्ये अडकलेल्या एका वृद्ध महिलेला वाचवण्यात दोन तरुणांना यश आले आहे.
नागपुरात कन्हान नदीच्या पुरात अडकलेल्या महिलेला वाचवण्यात यश - कन्हान नदी
खापरखेडा येथील सिलेवाडा परिसरातून कन्हान नदी वाहते. आज सकाळी सिलेवाडा येथील वृद्ध महिला सुमित्रा आसोले नदीपरिसरात गेली असता ती पुरामध्ये अडकली.
![नागपुरात कन्हान नदीच्या पुरात अडकलेल्या महिलेला वाचवण्यात यश](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3724767-thumbnail-3x2-nag.jpg)
महिलेला कन्हान नदीच्या पुरातून वाचवताना तरुण
महिलेला कन्हान नदीच्या पुरातून वाचवताना तरुण
खापरखेडा येथील सिलेवाडा परिसरातून कन्हान नदी वाहते. आज सकाळी सिलेवाडा येथील वृद्ध महिला सुमित्रा आसोले नदी परिसरात गेली असता ती पुरामध्ये अडकली. ती मदतीसाठी ओरडत होती. दरम्यान, अंकीत यादव आणि विनोद भारद्वाज हे दोन तरुण पुलावरून जात असताना तिचा आवाज कानी पडला. त्यांनी जिवाची पर्वा न करता नदीपात्रात उडी घेतली आणि तिला बाहेर काढले.
Last Updated : Jul 2, 2019, 7:41 PM IST