नागपूर -येथील राजाबाक्षा हनुमान मंदिर परिसरात विजय खंडाईत या तरुणाचा अज्ञात व्यक्तींनी खून केल्याची खळबळजनक घटना घडली. मृत विजय हा एका कृषी कंपनीत कार्यरत होता. त्याच्या हत्येमागील कारणांचा शोध पोलिसांनी सुरू केला असला तरी अद्याप कोणालाही पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाही.
हेही वाचा-सियाचीनमध्ये हिमस्खलन होऊन 4 जवानांसह 6 जणांचा मृत्यू
विजय रात्री उशिरा राजाबाक्षा परिसरातून जात असताना अंधाराचा फायदा घेत अज्ञात व्यक्तींनी त्याच्या कारसमोर दुचाकी आडवी लावली. विजयचा मार्ग रोखून आरोपींनी धारदार शस्त्रांचा वापर करून विजयची हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, विजय हा कारने मंदिर परिसरात आला होता. विजयवर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले.
जखमी अवस्थेत विजयला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॅाक्टरांनी विजयला मृत घोषित केले. विजयची हत्या कोणी, कोणत्या कारणांनी केली हे अद्याप अस्पष्ट असून इमामवाडा पोलीस घटनेच तपास करत आहेत.