नागपूर- जुगारातील पैशाच्या वादातून एका तरुणाची हत्या झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. आनंद शिरपूरकर असे मृत तरुणाचे नाव आहे. शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत गुजर नगर परिसरात ही करण्यात आली आहे.
जुगारातील पैशाच्या वादातून नागपुरात तरुणाची हत्या - Samir Shede
आनंदने रितेश शिवरेकर याच्याकडून १५ हजार रुपये उसने घेतले होते. मात्र, ते त्याने वेळेत परत केले नव्हते. त्यामुळेच रितेश आणि आनंदमध्ये वाद सुरू होता. सोमवारी आनंद दिसताच रितेश आणि त्याच्या चार सहकाऱ्यांनी आनंदवर चाकू हल्ला करत त्याची हत्या केली.
![जुगारातील पैशाच्या वादातून नागपुरात तरुणाची हत्या](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3994778-thumbnail-3x2-jjg.jpg)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद सोमवारीच्या सुमारास त्याच्या मित्रासह गुजर नगर परिसरात आला होता. तेव्हा जुगारातील उधारीच्या पैशावरून त्याचा रितेश शिवरेकर या तरुणासोबत वाद झाला. आनंदने रितेश शिवरेकरकडून १५ हजार रुपये उसने घेतले होते. मात्र, ते त्याने वेळेत परत केले नव्हते. त्यामुळेच रितेश आणि आनंदमध्ये वाद सुरू होता. सोमवारी आनंद दिसताच रितेश आणि त्याच्या चार सहकाऱ्यांनी आनंदवर चाकू हल्ला करत त्याची हत्या केली.
या प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा नोंदवला असून पोलिसांनी यश गोस्वामी आणि समिर शेडे या दोघांना अटक केली आहे. तर इतर आरोपी फरार आहेत.