नागपूर -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील घरासमोर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी आंदोलन सुरू होताच युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आले. यानंतर आंदोलक आक्रमक झाले होते. यावेळी सर्व आंदोलकांना पोलिसांनी अटक केली.
केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीसह संपूर्ण देशात विरोध प्रदर्शन सुरू आहेत. दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या आंदोलनाचा आज १९वा दिवस आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतरही तोडगा निघत नसल्याने आता अनेक राजकीय पक्ष सहभागी झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर कृषी कायदे मागे घेण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी युवक काँग्रेस कडून आज नागपूर येथील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घराला घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला.