नागपूर -युवक काँग्रेसच्यावतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात शहरातील गीतांजली चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यपाल भाजपचे असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच त्यांच्या फोटोला जोडे मारत निषेध नोंदवण्यात आला.
नागपुरात युवक काँग्रेसकडून राज्यपाल कोश्यारींविरोधात आंदोलन - नागपुरात युवक काँग्रेसकडून राज्यपाल कोश्यारींविरोधात आंदोलन
महाविकासआघाडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच या सर्व बाबीला राज्यपाल कोश्यारी जबाबदार असल्याचा आरोप युवक काँग्रेसकडून केला जात आहे. तसेच या देशातील सर्व निर्णय रात्रीच्या अंधारातच का घेतले जातात? असा प्रश्न देखील युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.
हे वाचलं का? - 'राजकारण खूप खालच्या पातळीवर गेलंय, 'क्या हम गुलामही अच्छे थे क्या?''
गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रात सत्तानाट्य सुरू आहे. मात्र, शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे हे सत्तानाट्य पुन्हा रंगले आहे. भाजपने लवकरात लवकर बहुमत सिद्ध करावे, अशी मागणी महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून होत आहे. त्यासाठी महाविकासआघाडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच या सर्व बाबीला राज्यपाल कोश्यारी जबाबदार असल्याचा आरोप युवक काँग्रेसकडून केला जात आहे. तसेच या देशातील सर्व निर्णय रात्रीच्या अंधारातच का घेतले जातात? असा प्रश्न देखील युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.