महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nagpur Suicide Case : धक्कादायक! क्रिकेट सट्ट्यामुळे कर्जबाजारी तरुणाची आत्महत्या, मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने आईचा मृत्यू - Suicide Case

क्रिकेट मॅचवर सट्टेबाजी करताना कर्जबाजारी झालेल्या 22 वर्षीय तरुण मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तरुण मुलाच्या मृत्यूने आईला जबर धक्का बसला. त्यामुळे आईचा ही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नागपुर शहरात घडली आहे. खितेन वाधवानी असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे तर दिव्या वाधवानी असे मृत आईचे नाव आहे.

Nagpur Suicide Case
नागपूर आत्महत्या प्रकरण

By

Published : May 23, 2023, 5:28 PM IST

डीसीपी. गोरख भामरे माध्यमाशी संवाद साधताना

नागपूर :लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छापरू नगर चौक परिसरात खितेन वाधवानी आणि त्याचे कुटुंबीय राहतात. खितेनच्या कुटुंबात त्याचे आई वडील आणि बहीण आहे. वडील नरेश वाधवानी इतवारीतील घाऊक मसाल्याचे व्यापारी आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खितेनला क्रिकेट सामन्यांवर सट्टेबाजीचे व्यसन होते. त्यामुळे त्याने क्रिकेट सामन्यावर सट्टेबाजीत खूप पैसे गमावले होते. क्रिकेट सामन्यात लावलेल्या सट्ट्यावर तो पैसे हरल्याने आणि आईने रागावल्यामुळे खितेन नैराश्यात गेला होता.

खितेन गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला : दुसऱ्या दिवशी वाधवानी कुटुंब नातेवाईकाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी शहरातील एका लॉनमध्ये गेले होते. मात्र, घरातून बाहेर पडत असताना खितेन खोलीत झोपला असल्याने त्याच्या आईने घराला बाहेरून कुलूप लावले होते. लग्न समारंभ आटोपून कुटुंबीय घरी परतल्यानंतर त्यांना खितेन घरातील स्वयंपाक घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.



मुलाचा मृतदेह बघून आईने प्राण सोडले :मुलाच्या या आत्मघाती पाऊलामुळे आई दिव्या वाधवानी यांचीही प्रकृती ढासळली. त्यांचाही सोमवारी दुपारी उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. क्रिकेट मॅचवर सट्टेबाजी करताना कर्जबाजारी झालेल्या 22 वर्षीय तरुण मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. खितेन वाधवानी असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे तर दिव्या वाधवानी असे मृत आईचे नाव आहे. सूत्रानुसार आयपीएल क्रिकेट सामन्यात सट्टेबाजीत पैसे हरल्यानंतर खितेनने आपला मोबाईल फोनही गहाण ठेवला होता. कर्जदार त्याला पैशासाठी सतत त्रास देत होते. सध्या पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details