नागपूर - येथे एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या एका तरुणाला नागरिकांनी चांगलाच चोप दिला आहे. हा तरुण मैत्री करण्यासाठी विद्यार्थिनीवर दबाव टाकत होता. मात्र, नकार देताच तो तिची छेड काढत होता. म्हणून या विद्यार्थिनीने नागरिकांच्या मदतीने छेडखानी करणाऱ्याला चांगलाच चोप दिला. यानंतर या तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना जिल्ह्यातील कळमेश्वर बस स्थानकावर घडली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या तरुणास नागरिकांनी चोपले, व्हिडिओ व्हायरल - पोलीस
नागपूरजवळ असलेल्या गोधनी परिसरात राहणारा संदीप निंबूरकर हा तरुण महाविद्यालयीन विद्यार्थिनीला मैत्री करण्यासाठी विचारणा करायचा. मात्र, तिने वारंवार त्याच्यासोबत मैत्री करण्यासाठी नकार दिला.
नागपूरजवळ असलेल्या गोधनी परिसरात राहणारा संदीप निंबूरकर हा तरुण महाविद्यालयीन विद्यार्थिनीला मैत्री करण्यासाठी विचारणा करायचा. मात्र, तिने वारंवार त्याच्यासोबत मैत्री करण्यासाठी नकार दर्शविला. त्या विद्यार्थिनीच्या नकारानंतरही या तरुणाने मैत्रीसाठी तिच्यावर दबाव आणत छेड काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर, कळमेश्वरच्या बस स्थानकावरील हा प्रकार बघून महाविद्यालयीन विद्यार्थिनीने नागरिकांच्या मदतीने त्याला चांगलाच चोप दिला.
त्यांनतर नागरिकांनी या तरुणाला कळमेश्वर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या या रोड रोमियोला चपराक बसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे.