नागपूर -देशातील वाढत्या महागाईने लोकांचे नुकसान केले आहे. केंद्रात भाजप सरकार आल्यानंतर सर्वाधिक युवकांचे नुकसान झाले आहे. देशातील तरुण हे बेरोजगार झाले आहे. यामुळे हे युथ येणाऱ्या 2024 निवडणुकीत हे भाजपचे सरकार उलथून लावतील आणि काँग्रेसचे सरकार सत्तेत येईल असा इशारा राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिला. ते नागपुरात संविधान चौकात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या हल्ला बोल आंदोलना दरम्यान प्रसार माध्यमांशी बोलत होते.
देशाची तरुणाई २०२४ मध्ये मोदी सरकार उलथवून लावेल - सुनील केदार
युवक काँग्रेसच्या वतीने सध्याच्या वाढत्या महागाई विरोधात सोमवारी हल्ला बोल आंदोलन केले. यावेळी युवक काँग्रेसने महागाई आणि मोदी सरकार विरोधात हातात फलक घेऊन वाढत्या महागाईचा विरोध केला. यावेळी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या मोर्चाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार हे ही यावेळी आले होते.
हुकूमशाही पद्धतीने वागत आहे
यावेळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनीही पायदळ मार्चमध्ये सहभाग घेतला. यात भाजप सरकारन ज्या पद्धतीने हुकूमशाहीने वागत आहे. लोकांचाईडी, सीबीआयच्या माध्यमातून दडपशाहीने काम करत आहे. फोन टॅपिंग करून हेरगिरी केली जात आहे हे सर्व संविधाना विरोधी काम चालू आहे, जीवनावश्यक वस्तू किमती वाढल्या, पेट्रोल डिझेलच्या किमतीने महागाई वाढली आहे, जनतेचे आर्थिक शोषन केले जात आहे. या विरोधात काँग्रेस पक्ष युवा हे रस्त्यावर उतरून काम करत आहे म्हणत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला.
हेही वाचा -राज्यात एक कोटी पूर्ण 'लसवंत', 3.16 कोटी लोकांना मिळाला पहिला डोस