नागपूर- शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील गणेश नगर परिसरात एका तरुणाचा निर्घृण खून झाला आहे. दुचाकी वेगाने चालवण्यावरून झालेल्या वादातून ही घटना घडली. सैफ अली उर्फ शाहरुख शोकत अली असे मृतकाचे नाव आहे. चार आरोपींनी संगनमत करून शाहरुखचा खून केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. तर एका आरोपीचा शोध घेतला जात आहे
शुल्लक कारणावरून तरुणाचा खून; तीन आरोपींना अटक - नागपूर लेटेस्ट क्राईम न्यूज
मृतक शाहरुखला वेगाने दुचाकी चालवण्याची सवय होती ज्यामुळे परिसरातील काही मंडळी नाराज झाली होती. अशा दुचाकी चालकांना अद्दल घडवण्यासाठी रस्त्यावर पहारा देणे सुरू केले.
एक आरोपी फरार
मृतक शाहरुखला वेगाने दुचाकी चालवण्याची सवय होती ज्यामुळे परिसरातील काही मंडळी नाराज झाली होती. घटनेच्या वेळी गणेश नगर परिसरात काही युवक वेगाने गाडी चालवत असल्याचे लक्षात येताच बब्ब्या, विनायक आर के पटेल, बंटी जैससह अन्य एका आरोपींनी अशा दुचाकी चालकांना अद्दल घडवण्यासाठी रस्त्यावर पहारा देणे सुरू केले. त्याच दरम्यान शाहरूख देखील त्या ठिकाणी आला. आरोपी आणि शाहरुख यांच्यात वादविवाद सुरू झाल्यानंतर आरोपींनी त्यांच्या जवळ असलेल्या धारधार शस्त्रांनी शाहरुख वर वार केले ज्यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या माहिती वरून पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे तर एक आरोपी फरार असल्याने त्याचा शोध घेतला जात आहे.