नागपूर- कळमना पोलीस ठाणे हद्दीत एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली आहे. नितेश पटेल असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
नागपूर: हातोडा आणि तलवारीने तरुणाची हत्या...आरोपी फरार - नागपूर क्राईम बातमी
बुधवारी संध्याकाळी नितेश पटेल घरी जात असताना सात जणांनी त्याच्यावर हातोडी आणि तलवारीने वार केले. या हल्ल्यात नितेशचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
![नागपूर: हातोडा आणि तलवारीने तरुणाची हत्या...आरोपी फरार young man murder by unknown in nagpur](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7661518-thumbnail-3x2-nag.jpg)
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी नितेश पटेल घरी जात असताना सात जणांनी त्याच्यावर हातोडा आणि तलवारीने वार केले. या हल्ल्यात नितेशचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी हत्येच्या कारणांचा शोध सुरू केला आहे. यात पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. याबाबत अधिक तपास सुरू असून आरोपींचाही पोलीस तपास घेत आहेत.