नागपूर- लोकांना आपले साहस दाखवण्यासाठी, विषारी सापाला आपल्या अंगाखाद्यांवर खेळवणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. सापाच्या दंशाकडे दुर्लक्ष केल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील सोमनाळा या गावात ही घटना घडली. श्रीराम डहारे असे मृत तरुणाचे नाव आहे. सापाने दंश केल्यानंतरही आपल्यावर देवाची कृपा आहे. त्यामुळे आपल्याला धोका नाही, असे त्याने सांगितल्याची माहिती आहे.
हेही वाचा - मी पुन्हा येईन, पुन्हा गाईन : अमृता फडणवीसांचा नवा निर्धार
विषारी सापाला गळ्यात घेत, लोकं आपले व्हिडिओ बनवत आहेत. त्यामुळे आपलं गावभर कौतुक होत आहे. लोकं आपल्याला सर्पमित्र संबोधत आहे. या अविर्भावात येऊन श्रीराम डहारे या २१ वर्षीय तरुणाला आपले जीव गमवावा लागला आहे. विषारी सापासोबत खेळता खेळता सापाने दंश केला. मात्र तरुणाने या दंशाकडे दुर्लक्ष केले. हळूहळू विष शरीरात पसरू लागल्याने श्रीराम डहारे नंतर बेशुद्ध झाला. त्याच्या नातेवाईकांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यत श्रीरामचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा - 'बजरंगी भाईजान'मधील 'मुन्नी'ने सर्वांना केले चकित, आता अशी दिसतेय हर्षाली मल्होत्रा
सोशल मीडियात आपण प्रसिद्ध होत आहोत. शिवाय लोकांकडूनही कौतुक केले जात आहे. याबरोबरच साप कुठे काय करू शकतो? या भावनेतून ही घटना घडली आहे. त्यामुळे सर्प हाताळण्याचा कोणताही अनुभव नसल्याने आणि सोशल माध्यमाच्या प्रसिद्धीपोटी श्रीरामला आपला जीव गमवावा लागला आहे.