नागपूर : आयुषला व्यवसायात प्रचंड नुकसान झाल्याने ते नैराश्यात गेले होते, त्यातुन त्याने डोक्यात गोळी मारून आत्महत्या केल्याची चर्चा आहे. घटेनची माहिती समजताच कामठी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी आयुषचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. आयुष त्रिवेदी कामठी शहरातील लाभेश लॉरेन ऑरेंज सिटी टाऊनशिपच्या मागे राहतो. आज दुपारी बारा वाजताच्या दरम्यान आयुष त्याच्या वरच्या खोलीत असताना मोठा आवाज झाला. तेव्हा त्रिवेदी कुटुंबातील लोकांनी खोलीत धाव घेतली. तेव्हा आयुष रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी आयुषला तपासून मृत घोषित केले.
व्यवसायात नुकसान की आणखी काही: घटनेची माहिती समजताच कामठी पोलिसांनी घटनास्थळ दाखल झाले. याशिवाय फॉरेन्सिक विभागाची टीम दाखल झाली असुन पुढील तपास सुरू आहे. आयुषने बंदूक कुठून आणली याबाबत देखील तपास सुरू केला आहे. आयुष त्रिवेदी व्यावसायिक होता, त्याच्याकडे दोन ते तीन ट्रक आणि इतर मशीन्स होत्या. गेल्या काही महिन्यांपाडून त्याला व्यवसायात नुकसान होत असल्याने तो नैराश्यात गेला होता, म्हणून त्याने आत्महत्या साखरे टोकाचे पाऊल उचलले असे बोलले जात आहे.
आर्थिक नैराश्येतून सलून कारागिराची आत्महत्या: या आधीही नागपूरयेथे अशीच एक घटना घडली होती. शैलेश नक्षणे हा तरुण बेसा परिसरातील एका सलूनमध्ये कारागीर म्हणून कामाला होता. ग्राहक नसल्याने त्याचे आर्थिक उत्पन्न कमी झाल्याने आर्थिक चणचण भासू लागली होती. शैलेश नक्षणे नामक व्यक्तीने सलूनमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. टाळेबंदीमुळे आर्थिक संकट ओढवल्याच्या नैराशेतून शैलेशने आत्महत्या केल्याची माहिती त्याच्या सहकाऱ्यांनी होती.