नागपूर - वेळ वाचविण्यासाठी अनेक दुचाकीस्वार नियमांचे उल्लंघन करित विरुद्ध दिशेने वाहन चालवितात. अशा बेजबाबदार चालकांवर कडक कारवाई करण्याची तयारी नागपूरच्या वाहतूक विभागाने केली आहे. विरुद्ध दिशेने गाडी चालवताना अपघात झाल्यास आता पोलीस हे चालकांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवण्याची तयारी करत आहेत.
नागपूरकरांनो सावधान! विरुद्ध दिशेने वाहन चालविल्यास दाखल होणार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा - सदोष मनुष्य वधाचा गुन्हा
विरुद्ध दिशेने गाडी चालवताना अपघात झाल्यास आता पोलीस हे चालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याची तयारी करत आहे.जुन्या कायद्यानूसार विरुद्ध दिशेने अपघात झाल्यास दोषी वाहन चालकावर ३०४ अंतर्गत गुन्हा नोंद व्हायचा, पण आता नवीन निर्णयानुसार ३०४-ए अंतर्गत गुन्हा नोंदवून कारवाई केली जाणार आहे.
नागपूर हे सर्वाधिक दुचाकी असलेले शहर म्हणून ओळखले जाते. याशिवाय मध्य भारतात सर्वाधिक वाहनांची संख्यादेखील नागपूर शहरातच असल्याने इथे मोठ्या प्रमाणात अपघातांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नागपूर शहर हे वाहन चालकांसाठी सुरक्षित नसल्याची भावना निर्माण होऊ लागली आहे. वाहतूक नियमांची पायमल्ली केल्याने अपघात घडल्याचे प्रमाण अधिक असल्याने वाहतूक विभागाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार उलट दिशेने वाहन चालविताना अपघातास कारणीभूत ठरल्यास दोषी वाहन चालकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे.
जुन्या कायद्यानूसार विरुद्ध दिशेने अपघात झाल्यास दोषी वाहन चालकावर ३०४ अंतर्गत गुन्हा नोंद व्हायचा, पण आता नवीन निर्णयानुसार ३०४-ए अंतर्गत गुन्हा नोंदवून कारवाई केली जाणार आहे. या निर्णयाद्वारे वाहतूक विभागाने शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या दृष्टिकोनातून कठोर पावले उचलायला सुरवात केली आहे.