महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जगातील सर्वात कमी उंचीच्या ज्योती आमगेने केले मतदान - election

लोकशाहीला बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे असून, विशेषत: तरुणांनी मतदान प्रक्रियेकडे दुर्लक्ष न करता उस्फूर्तपणे मतदान केले पाहिजे, असे आवाहनही तिने केले आहे.

जगातील सर्वात उंचीने लहान असनाऱ्या ज्योती आमगे ने केलं मतदान

By

Published : Apr 11, 2019, 1:46 PM IST

नागपूर- लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. आज नागपूर शहरात दोन हजारांहून अधिक मतदान केंद्रांमध्ये मतदान प्रक्रिया सुरू आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंद असणारी जगातील सर्वात कमी उंचीची महिला ज्योती आमगेनेही आज आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

ज्योती आमगे, नागपूर


ज्योती आमगे येणे आज आपला मतदानाचा हक्क बजावला. आपल्या आईसोबत ती मतदान केंद्रावर आली होती. तिला मतदान करण्यासाठी तिच्या आईने मदत केली. त्यांनतर तिने माध्यमांशीही संवाद साधला. लोकशाहीला बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे असून, विशेषत: तरुणांनी मतदान प्रक्रियेकडे दुर्लक्ष न करता उस्फूर्तपणे मतदान केले पाहिजे, असे आवाहनही तिने केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details