महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

World First Bamboo Crash Barrier : जगातील पहिला बांबू क्रॅश बॅरिअर, पर्यावरणपूरक आणि स्टीलला उत्तम पर्याय; नितीन गडकरींकडून कौतूक

नागपूरमध्ये बांबूपासून बनवलेला क्रॅश बॅरिअर बसवण्यात आला आहे. त्याची सध्या जोरदार चर्चा आहे. पर्यावरणपूरक असा हा क्रॅश बॅरिअर स्टील लोखंडाला उत्तम पर्याय असल्याचे सांगण्यात येत आहे. 200 मीटर लांबीचा क्रॅश बॅरिअर आहे.

World First Bamboo Crash Barrier
बांबू क्रॅश बॅरिअर

By

Published : Mar 5, 2023, 8:52 AM IST

नागपूर :महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांना जोडणार्‍या महामार्गावर 200 मीटर लांबीचा बांबूपासून बनवण्यात आलेला क्रॅश बॅरिअर बसवण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबबातची माहती दिली. हा जगातील पहिला बांबू क्रॅश बॅरियर असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. त्याला बाहूबली असे नाव देण्यात आले आहे. सध्या राज्यासह देशभरात आणि देशाबाहेरही त्याची जोरदार चर्चा आहे.

स्टीलला एक परिपूर्ण पर्याय :बांबूपासून बनवलेला हा क्रॅश बॅरिअर स्टीलला एक परिपूर्ण पर्याय आहे. असे देखील नितीन गडकरी यांनी नमूद केले आहे. देश आणि बांबू क्षेत्रासाठी ही उल्लेखनीय कामगिरी ठरू शकते असे संबोधले आहे. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे पर्यावरणासाठी हीनकारक नसणे. एका ट्विटमध्ये गडकरी म्हणाले, आत्मनिर्भरभारत साध्य करण्याच्या दिशेने एक विलक्षण कामगिरी वणी-वरोरा महामार्गावर करण्यात आली आहे. जगातील पहिल्या 200 मीटर लांबीचा बांबू क्रॅश बॅरियर हा आपण विकासाच्या मार्गावर जात असल्याचे उत्तम उदाहरण आहे.

चाचण्यांमध्ये उत्तम रेटींग प्राप्त : पिथमपूर, इंदूर येथील नॅशनल ऑटोमोटिव्ह टेस्ट ट्रॅक्ससारख्या विविध सरकारी संस्थांमध्ये त्याची कठोर चाचणी घेण्यात आली. रुरकी येथील सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट येथे आयोजित फायर रेटिंग चाचणी दरम्यान वर्ग 1 म्हणून त्याने रेटींग मिळवली आहे. शिवाय, त्याला इंडियन रोड काँग्रेसनेही मान्यता दिली आहे, असे नितीन गडकरी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

कसा बनवला क्रॅश बॅरिअर : हा बॅरियर बनवण्यासाठी वापरण्यात येणारी बांबूची प्रजाती म्हणजे बांबुसा बालकोआ. ज्यावर क्रिओसोट तेलाने प्रक्रिया केली गेली आहे. त्यावर हाय-डेन्सिटी पॉली इथिलीनचा त्यावर थर देण्यात आला आहे. ही कामगिरी बांबू क्षेत्रासाठी आणि संपूर्ण भारतासाठी उल्लेखनीय आहे. कारण हा क्रॅश बॅरियर स्टीलला एक परिपूर्ण पर्याय आहे. पर्यावरणविषयक चिंता आणि समस्या सोडवतो. शिवाय, हा एक ग्रामीण आणि कृषी-अनुकूल उद्योग आहे, तो आणखी महत्त्वाचा टप्पा ठरत आहे, असे गडकरी पुढे म्हणाले.

हेही वाचा :Mumbai Girl Rapper: गोवंडीच्या झोपडपट्टीत राहणारी 'ती' छोटी रॅपर बनवतेय युनिसेफसाठी ट्रॅक

ABOUT THE AUTHOR

...view details