नागपूर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Union Minister Nitin Gadkari यांच्या संकल्पनेतून नागपूर शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी महत्वपूर्ण तसेच महत्वाकांक्षी अनेक प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत. त्यापैकीच एक सुप्रकल्प म्हणजे प्रसिध्द फुटाळा तलावाच्या Futala Lake in Nagpur निसर्ग सौंदर्यात अलौकिक भर घालणे देखील आहे. त्याअंतर्गत फुटाळा येथे पाण्यावर तरंगणारा जगातील सर्वात मोठा संगीतमय कारंजा म्हणजेचं म्युझिकल फाउंटन Worlds largest water floating musical fountain तयार करण्यात आला आहे. याशिवाय लाईट शो देखील नागपूरकरांना आता बघता येणार आहे. आज या प्रकल्पाचे प्रथम प्रात्यक्षिक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले आहे.
संगीताच्या तालावर नाचणारतलावाचे पाणी फाउंटनच्या माध्यमातून मधूर संगीताच्या तालावर नाचणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात म्युझिकल फाउंटन आणि लाईट शो प्रकल्पाच्या ट्रायल घेण्यात आले होते, त्यावेळी सुद्धा नितीन गडकरींनी हजेरी लावली होती. फुटाळा तलावातील म्युझिकल फाउंटन हा जगातील सर्वात उंच म्युझिकल फाउंटन असल्याचा दावा केला जात आहे. या म्युझिकल फाउंटन बरोबर वाजणारे संगीत दिग्दज संगीतकार ए.आर रेहमान यांचे आहे.
३४ मिनिटांचा शो म्युझिकल फाउंटनचा प्रत्येक शो ३४ मिनिटांचा असणार आहे. हा प्रकल्प साकार करण्यासाठी केंद्र सरकारच्या रोड फंडातून ३० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. एकवेळ ४ हजार प्रेषक एकत्र या शो चा आनंद घेऊ शकणार आहे. त्याचबरोबर भव्यदिव्य पार्किंग, फूड प्लाझा यासह अनेक सोयीसुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.