महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपुरात मतदान केंद्रावर महिलाराज; मतदान अधिकाऱ्यांसह पोलीसदेखील महिलाच - nagpur

महिलांमध्ये जनजागृती व महिलांचा सहभाग वाढविण्यााठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. नागपूर मतदारसंघातील नंदनवन प्रभागातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील मतदान केंद्राची यासाठी निवड करण्यात आली  आहे. हे 'सखी' मतदान केंद्र अधिकाधिक आकर्षक आणि सुंदर बनविण्यासाठी रांगोळी आणि रंगरंगोटीसह येथील स्वछता आणि साफसफाईवर विशेष भर देण्यात आला आहे.

सखी महिला मतदान केंद्र

By

Published : Apr 11, 2019, 12:15 AM IST

नागपूर- महिलांमध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि महिलांनी मतदानात समान सहभाग नोंदवावा, याकरता प्रत्येक लोकसभा मतदारसंघात महिला व्यवस्थापीत मतदान केंद्र निर्माण करण्यात आले आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातदेखील सखी मतदार केंद्र उद्याच्या मतदाणासाठी सज्ज झाले आहे.

सखी महिला मतदान केंद्र
महिलांमध्ये जनजागृती व महिलांचा सहभाग वाढविण्यााठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. नागपूर मतदारसंघातील नंदनवन प्रभागातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील मतदान केंद्राची यासाठी निवड करण्यात आली आहे. हे 'सखी' मतदान केंद्र अधिकाधिक आकर्षक आणि सुंदर बनविण्यासाठी रांगोळी आणि रंगरंगोटीसह येथील स्वछता आणि साफसफाईवर विशेष भर देण्यात आला आहे.२०१४ च्या निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी महिला मतदारांचा टक्का प्रत्येकी हजार पुरुषांमागे स्त्री ८९९ वरून ९११ वर पोहोचला आहे. यंदाच्या निवडणुकीत महिलाशक्ती निर्णायक ठरणार आहे. महिला मतदान केंद्रासाठी विशेष सुरक्षादेखील असेल. पोलीस ठाण्यापासून आणि अधिकाऱ्यांच्या कायम संपर्कात असणाऱ्या नंदनवन भागातली अभियांत्रिकी महाविद्यालयात या विशेष प्रयोगाची अंमबलबजावणी करण्यात येणार आहे. या मतदान केंद्रावर सर्व मतदान अधिकारी व कर्मचारी या महिलाच असणार असून सुरक्षा यंत्रणा पुरवणाऱ्याही पोलीस अधिकारीही महिलाच असणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details