नागपूर- येथील महानगर पालिकेच्या परिवहन विभागाने भंगार झालेल्या स्टार बसेसचा उपयोग करण्याचे ठरवले आहे. या बसेसमध्ये सुलभ शौचालय तयार करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे नागपूरमध्ये सुलभ शौचालयांची संख्या वाढणार आहे. यासाठी महापालिकेने अर्थसंकल्पात १ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
भंगार झालेल्या बसचे शौचालयात रुपांतर करणार ; नागपूर परिवहन विभागाचा निर्णय
नागपूर शहराचा विकास आणि विस्तार वेगाने होत आहे. पण त्या तुलनेत येथे सुलभ शौचालयांची संख्या फार कमी आहे. एकीकडे देशभरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता गृहांची निर्मिती केली जात आहे, तर दुसरीकडे कडे अभिनव प्रयोगाच्या माध्यमातून या अभियानाला चालना दिली जात आहे.
नागपूर शहराचा विकास आणि विस्तार वेगाने होत आहे. पण त्या तुलनेत येथे सुलभ शौचालयांची संख्या फार कमी आहे. एकीकडे देशभरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता गृहांची निर्मिती केली जात आहे, तर दुसरीकडे अभिनव प्रयोगाच्या माध्यमातून या अभियानाला चालना दिली जात आहे. लोकसंख्येच्या तुलनेत शहरात सार्वजनिक स्वच्छता गृहांची संख्या कमी आहे. महिलांसाठीच्या सुलभ शौचालयांची संख्या सुद्धा कमी आहे. म्हणून नागपूर महानगर पालिकेच्या परिवहन विभागाने भंगार झालेल्या स्टार बसेसचा उपयोग सुलभ शौचालय तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेने या उपक्रमाकरीता अर्थसंकल्पात १ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये १ कोटींचा निधी परिवहन विभाग खर्च करणार आहे. तर उर्वरित १ कोटींच्या निधीची तरतूद स्थायी समितीने सादर केलेल्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. परिवहन विभागाच्या या उपक्रमाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न झाल्यास नागपुरात सुलभ शौचालयांची संख्या वाढणार आहे.