नागपूर -केंद्र सरकारने आज सादर केलेला अर्थसंकल्प हा महिलांच्या दृष्टीने निराश करणारा असल्याच्या प्रतिक्रिया महिला उद्योजकांनी दिल्या आहेत. उद्योगाच्या दृष्टीने बजेट समधानकारक असले तरी त्यात महिला उद्योजकांसाठी कोणतीही नवी घोषणा केली नसल्याचे महिला उद्योजकांनी म्हटले आहे.
'अर्थसंकल्प महिलांच्या दृष्टीने निराश करणारा' - केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादर केला
केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाबाबत महिला उद्योजिका समाधानी नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हा अर्थसंकल्प महिलांच्या दृष्टीने निराश करणारा असल्याच्या प्रतिक्रिया महिला उद्योजकांनी दिल्या आहेत.
केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यानंतर अनेकांकडून यावर टीका होताना दिसत आहे. या अर्थसंकल्पात सरकारने अनेक नव्या योजनांच्या घोषणा केल्या आहेत. मात्र, महिला उद्योजकांनी यावर टीका केली आहे. मेक इन इंडिया असो की इतर दुसरी योजना, यामध्ये महिलांना सहभाग देणे गरजेचे आहे. उद्योग जगतातही महिला उद्योजीका आपले कर्तृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. अश्यात त्यांना पाठबळ मिळण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी महिला उद्योजिकांसाठी नवीन धोरण आणणे गरजेचे होते. तसे काहीच झाले नसल्याने विदर्भातीला महिला उद्योजिकांचे फारसे समाधान झाले नसल्याचे महिलांनी म्हटले आहे.