महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पतीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून नागपूरमध्ये महिलेची आत्महत्या - हुडकेश्वर पोलीस ठाणे

विक्रम नारनवरेचे 2015 मध्ये आरोपी जयश्रीसोबत लग्न झाले होते. त्याच्याकडे एका मोबाईल कंपनीच्या सीमकार्डची एजन्सी आहे. काही महिन्यांपासून विक्रमचे अनैतिक संबंध असल्याचा संशय जयश्रीला होता.

नागपूरमध्ये महिलेची आत्महत्या

By

Published : Sep 21, 2019, 9:06 PM IST

नागपूर- हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 30 वर्षीय विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली. पतीच्या अनैतिक संबंधामुळे विवाहितेने आत्महत्या केल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. जयश्री विक्रम नारनवरे असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी पती विक्रम नारनवरेला अटक केली आहे.

नागपूरमध्ये महिलेची आत्महत्या

हेही वाचा - नागपूर विभाग : भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई ?

विक्रम नारनवरेचे 2015 मध्ये आरोपी जयश्रीसोबत मध्ये लग्न झाले होते. त्याच्याकडे एका मोबाईल कंपनीच्या सीमकार्डची एजन्सी आहे. काही महिन्यांपासून विक्रमचे अनैतिक संबंध असल्याचा संशय जयश्रीला होता. त्यातून तिने हे टोकाचे पाऊल उचालल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे.

हेही वाचा - विदेशीची चव देशीत, धान्यापासून देशी दारू बनवायला सरकारची मान्यता

जयश्री आणि विक्रममध्ये नेहमी वाद व्हायचे. विक्रम तिला मारहाणही करत होता. तिला कायम टोचून बोलत होता. त्याच्यांत वारंवार वाद होत असल्यामुळे विक्रमने 4 महिन्यांपूर्वी वडिलांचे घर सोडून हुडकेश्वरमधील महालक्ष्मी नगरात भाड्याचे घर घेतले होते. तेथे हे दोघेच राहत होते. नेहमीप्रमाणे विक्रम दुपारच्या सुमारास घरी परत आला असता त्याला जयश्री सिलिंग फॅनला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली.

ABOUT THE AUTHOR

...view details