महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Woman Body Found: वडगाव शिवारातील शेतात आढळला गळा चिरलेला महिलेचा मृतदेह - अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला

Woman Body Found : नागपूर शहरातील हिंगणा पोलीस ठाण्या अंतर्गत असलेल्या गुमगाव-वडगाव रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात काल (मंगळवारी) दुपारी एका ३५-४० वर्षीय महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. (Woman body found in pool of blood) या घटनेनं परिसरात खळबळ उडाली. अद्याप महिलेची ओळख मात्र पटलेली नाही.

Woman Body Found
महिलेची हत्या

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 15, 2023, 4:56 PM IST

नागपूर Woman Body Found :समृद्धी महामार्गाच्या बाजूला गुमगाव-वडगाव हा छोटा रस्ता आहे. या रस्त्याच्या लगत वडगाव शिवारात गुमगावचे शेतकरी आष्टणकर आणि मातीखाये यांच्या शेताच्या सीमेवर काल दुपारी एका अनोळखी महिलेचा मृतदेह शेतात काम करणाऱ्या मजुरांना दिसला. त्यानंतर लगेचचं या संदर्भात माहिती हिंगणा पोलिसांना देण्यात आली. हिंगणा पोलीस ठाण्याचे ठाणेदार विशाल काळे, पोलीस निरीक्षक गोकुल महाजन घटनास्थळी दाखल झाले. (Woman Murder Case Nagpur)


जीवे मारून शेतात फेकले : मयत महिलेचं वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे असून तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राचे वार करण्यात आले आहेत. महिलेची हत्या याच ठिकाणी झाली असावी किंवा तिला मारून इथे फेकून देण्यात आलं असावं अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. याबद्दल पोलीस अद्याप काही बोलले नाहीत; मात्र ती गुमगाव किंवा वडगाव येथील रहिवासी नसल्याचं समोर येत आहे. घटनास्थळी डीसीपी अर्चित चांडक, एसीपी शरद कदम हेसुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठविला आहे. पोलीस महिलेची ओळख पटविण्यासाठी आणि आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत : अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना यापूर्वीही घडल्या आहेत. अशीच एक घटना नंदुरबार शहरानजीक असलेल्या नारायणपूरला 27 ऑगस्ट, 2021 रोजी घडली होती. येथे रस्त्यावर एका अनोळखी तरुणीचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आल्याचे समोर आले होते. या तरुणीचे शिर आणि धड वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्याठिकाणी दाखल होऊन परिसराची झाडाझडती घेतली. याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून मृत तरुणी कोण, याचा पोलीस शोध घेत आहेत.

श्वानपथकाची पाहणी:अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी श्‍वान पथकासह ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. परंतु, मृत तरुणी कोण आहे आणि तिचा घातपात झाला आहे काय, असा संशय व्यक्त होत आहे. या घटनेबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. शहरानजीक तरुणीचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळल्यानं तर्कवितर्क लावण्यात येत होते.

हेही वाचा:

  1. नंदुरबारजवळ आढळला छिन्नविछिन्न अवस्थेतील अनोळखी महिलेचा मृतदेह
  2. यावलखेड शेत शिवारात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह
  3. पुण्यात भीमानदीपात्रात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

ABOUT THE AUTHOR

...view details