नागपूर - अवघ्या 12 तासात नागपूर शहर पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या दोन वेगवेगळ्या अपघातात मृत्यू झाला. भास्कर हनुमंते व राहुल वरखडे, असे मृत पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
नागपुरात 12 तासात दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू - हुडकेश्वर पोलीस स्टेशन
भास्कर हनुमंते व राहुल वरखडे, असे मृत पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
अपघाताची पहिली घटना नागपूर - उमरेड मार्गावर घडली. यात हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत भास्कर हनुमंते यांचा मृत्यू झाला आहे. भास्कर हनुमंते हे गुरुवारी रात्रीच्या सुमारास इतर दोन मित्रांसह उमरेड तालुक्यात खासगी काम आटोपून परत येत असताना अडवाणी ढाब्याजवळ झालेल्या अपघातात झाला. त्यांना उपचारासाठी नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला, तर इतर दोन जण जखमी झाले आहेत.
अपघाताची दुसरी घटना नागपूरच्या सोमवारी क्वार्टर परिसराजवळ घडली. बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस शिपाई पदावर कार्यरत राहुल वरखडे हे मध्यरात्री दुचाकीवरून जात असताना विरुद्ध दिशेने आलेल्या चारचाकी वाहनासोबत झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा दोन अपघातात मृत्यू झाल्याने नागपूर पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.