महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अधिवेशनाचा दुसरा दिवस: विरोधक सरकारला आजही कोंडीत पकडणार? - nagpur

विधानपरिषदेच्या विरोधीपक्ष नेत्यांची निवड झाल्यानंतर सभागृहात राहुल गांधींच्या विषयावर चर्चा सुरू झाली होती. मात्र, विरोधक आजही सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करू शकतील, अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे.

winter-session-nagpur
अधिवेशनाचा दुसरा दिवस: विरोधक सरकारला आजही कोंडीत पकडणार?

By

Published : Dec 17, 2019, 11:46 AM IST

नागपूर -हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. राज्यपालांच्या अभिभाषणाने 12 वाजता विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे. लक्षवेधी सूचना मांडल्या जाणार आहेत. विरोधकांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्यात दिवशी सरकारला राहुल गांधींनी सावरकर यांच्यावरील केलेल्या वक्तव्यावर कोंडीत पकडले होते.

अधिवेशनाचा दुसरा दिवस: विरोधक सरकारला आजही कोंडीत पकडणार?

हेही वाचा - राज्य सरकार ५० दिवस तरी टिकणार का? रामदास आठवलेंचा उपरोधिक प्रश्न

विधानपरिषदेच्या विरोधीपक्ष नेत्यांची निवड झाल्यानंतर सभागृहात राहुल गांधींच्या विषयावर चर्चा सुरू झाली होती. मात्र, विरोधक आजही सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करु शकतात. पक्षातून भाजपच्या विरोधीपक्ष नेत्याच्या निवडीवरून चिमटे काढले होते. आज भाजपची बैठक होणार आहे. दुसऱ्या दिवशीही कामकाज बंद पाडण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.

आज सत्ताधारी उत्तर देतात की विरोधक कोंडीत पकडतात याकडे लक्ष लागले आहे. महाविकासआघाडी आणि भाजपची बैठक होणार असून यासाठी रणनीती आखण्याचे काम सुरू आहे. यामुळे कामकाज कसे चालेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा - 'मोदी सरकार हिंसा आणि विभाजनाची जननी', सोनिया गांधींची टीका

ABOUT THE AUTHOR

...view details