महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Winter Session : हिवाळी अधिवेशन केवळ 10 दिवसात गुंडाळणार? नागपूर कराराप्रमाणं अधिवेशन दोन महिने चालवा-विरोधकांची मागणी - कामकाजाचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर

Winter Session : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान होणार असून दहा दिवसाच्या कामकाजाचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यावरुन विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.

tentative schedule announced
हिवाळी अधिवेशन केवळ 10 दिवसात गुंडाळणार? जाणून घ्या वेळापत्रक

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 22, 2023, 11:28 AM IST

नागपूर Winter Session : महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं तात्पुरतं वेळापत्रक जाहीर झाले. 7 डिसेंबर ते 20 डिसेंबरला नागपुरात हिवाळी अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान, हे अधिवेशन २० डिसेंबरला गुंडाळलं जाणार की पुढं कामकाज सुरू राहणार, हे विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे. तसंच साधारणपणे दरवर्षी हिवाळी अधिवेशनाचं सूप शुक्रवारी वाजतं. मात्र, या वर्षी ते २० डिसेंबर म्हणजे बुधवारीच गुंडाळले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाला दोन दिवसांची कात्री लावली जाणार का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.



हिवाळी अधिवेशन दोन महिने घ्या : हिवाळी अधिवेशन गुंडाळण्याच्या मुद्द्यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करत ते म्हणाले की, हिवाळी अधिवेशनात केवळ दहा दिवसांचंच कामकाज निश्चित करण्यात आलं आहे. देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री नसून उपमुख्यमंत्री आहेत. ते विदर्भातल्या नागपूरचे आहेत. त्यांनी अधिवेशन नागपूर कराराप्रमाणे चालवलं पाहिजे. तसंच आमची भूमिका स्पष्ट आहे. नागपूर करार प्रमाणे हे अधिवेशन किमान दोन महिने चालले पहिजे, असं ते म्हणाले.


हिवाळी अधिवेशन चार आठवडे चालवावे : पुढं ते म्हणाले की, नागपूर कराराप्रमाणे हिवाळी अधिवेशन सहा आठवडे चालणे अपेक्षित आहे. तसे जमत नसेल तर किमान तीन ते चार आठवडे तरी हिवाळी अधिवेशन चालवलं पाहिजे. सरकारमध्ये सर्व रिमोट नागपूरकरांच्या हातात आहे. तुम्ही ठरवाल ती पूर्व दिशा असणार आहे. दोघे तर बाहुले आहेत, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. तसंच कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा -

  1. Monsoon Session 2023: अधिवेशन संपण्यापूर्वी बोगस खते-बियाण्याबाबत कडक कायदा करणार- कृषीमंत्र्यांची ग्वाही
  2. Privilege Motion Committee : विधानसभेत हक्कभंग समिती नेमली पण परिषदेत मुहूर्त मिळेना; 'हे' आहे कारण
  3. Sachin Ahir On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हे यांच्या मुद्द्यावर न्याय मिळेपर्यंत लढणार - सचिन अहिर

ABOUT THE AUTHOR

...view details