नागपूर -महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश वनविभागाची सामूहिक कारवाईमध्ये वाघांसह वन्य प्राण्याच्या अवयवांची तस्करी करणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. यात आरोपीकडून हाडे तेच दुसऱ्या कारवाईत हरणाचे शिंग आणि बंदूक जप्त करण्यात आले आहे. यामध्ये देवलापार आणि रामटेक वन विभागाच्या चमूने बालचंद बरकदे (40) याला वाघाच्या शिकार प्रकरणात तर इतर कारवाईत रोशन नंदलाल उईके आणि नरबद पुन्नू कोडवते असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
वन विभागाची दोन ठिकाणी कारवाई -
नागपूर जिल्ह्याच्या रामटेकचा येथील रहिवासी असलेला बालचंद बरकदे याला महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवरून अटक करण्यात आली. तर देवलापार वन विभागाला काही लोक खवल्या मांजराचे खवले आणि वन्य प्राण्यांचे हाडाची विक्रीच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळाली. यावरून देवलापार पिंडकपार भागातून रोशन उईके आणि 1 बंदूक, हरणाचे शिंग आणि रानडुकराची कवटी जप्त केली असता त्याच गावातील नरबद पुन्नू कोडवते यांच्याकडे 4 हरणाचे शिंग आणि बंदूक आणि सुरा असे सहित्य जप्त करण्यात आले. तसेच बुलेट गन पावडर ताब्यात जप्त केले.
9 किलो वाघ आणि वन्य प्राण्याचे हाडे जप्त -
वन विभाग हे मागील काही दिवसांपासून वन्य जीव आणि वाघांची शिकार करणाऱ्याच्या मागोवा घेत आहे. यात काही दिवसांपूर्वी चौघांना अटक करत त्यांच्याकडून वाघांचे पंजे आणि कातडी जप्त करण्यात आली होती. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या भागात मोठ्या प्रमाणात जंगल व्याप्त भाग आणि वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे या भागात शिकारी सक्रिय आहे. वन्यजीव गुन्हे अन्वेषण ब्युरोकडून वन्यप्राण्यांच्या हाडे असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यात मंगळवारी रात्री खवास या गावातून बालचंद बरकदे टाळा याच्याकडून जवळपास 9 किलो वाघ आणि प्राण्याचे हाडे जप्त करण्यात आले.