महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरू करा, आमदारांचे मुंख्यमंत्र्यांना निवेदन - खंडपीठ

कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरू करावे, अशी मागणी कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील आमदारांनी केली.

मुख्यमंत्र्यांना मागणीचे निवेदन देताना आमदार
मुख्यमंत्र्यांना मागणीचे निवेदन देताना आमदार

By

Published : Dec 21, 2019, 7:14 AM IST

नागपूर- मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात सुरू करावे, अशी मागणी कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.


नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात वरील जिल्ह्यातील आमदारांनी शुक्रवारी (दि. 19 डिसें) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, या मागणीचे निवेदन दिले. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी या खंडपीठासाठी लवकरच सर्वांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक आयोजित करू, असे आश्वासन दिले.

हेही वाचा - अंतिम आठवडा प्रस्तावाला मंत्र्यांची दांडी, प्रवीण दरेकरांचा सरकारवर हल्लाबोल


यावेळी, आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, पी.एन. पाटील, चंद्रकांत जाधव, प्रकाश आवाडे, राजेश पाटील, प्रकाश आबिटकर, ऋतुराज पाटील, राजू आवळे, सुरेशदादा खाडे, शहाजी पाटील, शेखर निकम, वैभव नाईक, महेश शिंदे, विश्वजित कदम, विक्रम सावंत, बाळासाहेब पाटील, दीपक चव्हाण उपस्थित होते.

हेही वाचा - राज्यातील तब्बल १ लाख एकर शेती सावकारांनी केली हडप, जरब बसवण्यासाठी समिती गठीत

ABOUT THE AUTHOR

...view details