महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Website Hacked: भारत विरोधी मोहीमेचा भाग, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची वेबसाईट हॅक - anti India campaign

नागपूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (Institute of Science) शासकीय विज्ञान महाविद्यालयाची वेबसाईट हॅक (Website Hacked) झाली आहे. याची जवाबदारी ड्रॅगन फोर्स ऑफ मलेशिया (Dragon Force of Malaysia) या संघटनेने घेतल्याचे कळवले आहे. यात भारताविरुद्ध मोहीमेचा ( anti India campaign) भाग म्हणून साईट हॅक केल्याचा मेसेज त्या वेबसाईटवर पब्लिश करण्यात आला आहे.

Website hacked
वेबसाईट हॅक

By

Published : Jun 13, 2022, 9:58 AM IST

नागपुर:भाजप प्रवक्ता नुपूर शर्मा यांनी पैगंबरा बद्दल वक्तव्य केल्या नंतर सुरु झालेला वाद वाढतच चालला आहे. देश भरात ठिकठिकाणी निदर्शने सुरु आहेत. काही ठिकाणी यामुळे तणावपुर्ण वातावरण आहे. तसेच देशा बाहेरही या वर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत यातच आता काही हॅकरने पुढाकार घेतल्याचे पहायला मिळत आहे. नागपूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स शासकीय विज्ञान महाविद्यालयाची वेबसाईट त्यांनी हॅक केली आहे. याची जवाबदारी ड्रॅगन फोर्स ऑफ मलेशिया या संघटनेने घेतल्याचा उल्लेख केला आहे. यात भारताविरुद्ध मोहीम म्हणून साईट हॅक केल्याचा मेसेज त्याच वेबसाईटवर पब्लिश करण्यात आला आहे. या संदर्भात कॉलेजकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पण या साईटसर्च केली असता साईट हॅक झाल्याचे दिसत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details