नागपूर :भरत कालीचरण उर्फ अक्कु यादव या नावाने पुन्हा एकदा 19 वर्षांपूर्वी घडलेल्या त्या भयाण घटनेची आठवण ताजी झाली (Akku Yadav in news again) आहे. अक्कु यादव हे नाव कोणताही नागपूरकर कधीच विसरू शकत नाही. किंबहुना अक्कु यादवचा उल्लेख केल्याशिवाय नागपूरच्यागुन्हेगारीचा इतिहास पुर्ण होऊ शकत नाही. गावगुंड अक्कु यादव नाव पुन्हा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे इंडियन प्रेडेटर : मर्डर इन कोर्टरूम (Web series Indian Predator Murder in Courtroom) नावाची वेब सिरीज सध्या नेटफ्लिक्सवर गाजत आहे. 19 वर्षांपूर्वी दोनशे महिलांनी कुख्यात गुंड, बलात्कारी अक्कु यादवची भर न्यायालयाच्या खोलीत सुनावणी सुरू असताना हत्या केली होती. ही घटना त्यावेळी संपूर्ण भारतात गाजली होती. न्यायालयात घडलेल्या त्या घटनेमुळे नागपूर बपोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
दहशतीच्या सावटाखाली जीवन :अक्कू यादव नागपूरच्या कस्तूरबा नगरमधला एक गुंड होता. त्याची दहशत कस्तूरबा नगर शिवाय आजूबाजूला परिसरात देखील होती. त्यांच्या नावावर लुटमार, मारामारी खून आणि बलात्काराचे अनेक गुन्हे दाखल होते. परंतु त्यांच्यावरचे आरोप कधी सिद्ध व्हायचे नाही, काही दिवस जेलमध्ये काढल्यानंतर तो बाहेर पडायचा आणि तो बाहेर आला की कस्तुबा नगरातील नागरिक दहशतीच्या सावटाखाली जीवन जगत होते. दर दिवसाला त्याची भीती लोकांमध्ये वाढतंच होती. म्हणून भरतला अक्कु यादव म्हणून आपली दहशत निर्माण करायला वेळ लागली (Web series on Netflix) नाही.
भरत कालीचरण ते अक्कु यादव :अक्कू यादवच्या नावावर खून, दरोडा, अपहरण, बलात्कार, खंडणी आणि सिरीयल किलिंग सारखे अनेक गुन्हे नोंद होते. तो कस्तुरबा नगर झोपडपट्टीत लहानाचा मोठा झाला. त्या वस्तीत अनेक गुन्हेगार राहायचे, त्यामुळे प्रतिस्पर्धी टोळ्यांचा संघर्ष त्यांने जवळून बघतीला होता. हळूहळू त्याने सुद्धा आपली दहशत निर्माण करायला सुरुवात केली, आणि बघता बघता तो कस्तुरबा नगर झोपडपट्टीचा 'दादा' झाला.
१३ वर्षांची दहशत :अक्कु यादवचा जन्म 1972 साली झाला. तो केवळ 19 वर्षांचा असताना त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर सलग 13 वर्ष त्याची दहशत कस्तुरबा नगरात किंबहुना नागपूर शहरात निर्मिती झाली होती. या 13 वर्षात त्याने बलात्कार, खून, घरफोडी आणि खंडणीसारखे गुन्हे केले. स्वतःचे व्यावसायिक साम्राज्य उभे करण्याचा प्रयत्न केला. त्याने लोकांकडून पैसे उकळले, विरोध करणाऱ्यांना जीवानिशी ठार मारले. महिलांवर अत्याचार आणि अपहरणाचा त्याचा धंदा जोरात सुरू असताना त्याने 13 वर्षात 40 हून अधिक महिला आणि मुलींवर बलात्कार केला. त्याची वाढत्या दाहशतीपुढे पोलीस यंत्रणा देखील हतबल ठरली (Web series Indian Predator Murder in Courtroom) होती.
अक्कुची सुनावणी सुरू असताना हत्या :1991 ते 2004 ते 13 वर्षांत अक्कु यादवची दहशत इतकी वाढली होती, की त्याच्या विरोधात कुणीही बोलायला तयार होत नसे. मात्र, कस्तुरबा नगर झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलांच्या मनात त्याच्या विरोधात राग, द्वेष, संताप खदखदत होता. पोलिसांनी अक्कुला एका प्रकरणात ताब्यात घेतले होते. त्याला न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती महिलांना समजली. अक्कुचा कायमचा धडा शिकवण्याची हीच संधी आहे, हे लक्षात आल्यानंतर महिला एकत्र होऊन न्यायालयात धाव घेतली. आणि कोर्ट रूममध्ये सुनावणी सुरू असताना अक्कुवर हल्ला चढवला. क्षणात अक्कु जमिनीवर कोसळला. त्याचा खून इतक्या क्रूर पद्धतीने करण्यात आला होता, की या हल्ल्यात अक्कू यादवचे लिंग देखील कापून टाकण्यात आले होते. सुमारे दहा पंधरा मिनिटे हा हल्लाचा प्रकार झाला होता. अक्कूच्या शरिराची अक्षरश: चाळण करण्यात आली होती.
महिलांची निर्दोष सुटका :अक्कूच्या गुंडगिरीला वैतागलेल्या संतप्त जमावाने १३ ऑगस्ट २००४ रोजी अक्कू यादवची हत्या केली. या खटल्याचा अखेर १० वर्षे २ महिन्यांनी निकाल लागला. 2014 साली नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष सुटका (Akku Yadav) केली.
न्यायालयात हत्या :गुंड विजय मते नामक गुंडावर गोळीबार झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी पिंटू शिर्केला अटक केली होती. १९ जून २००२ रोजी त्याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले. यावेळी विजय मते, राजू भद्रे आणि साथीदारांनी पिंटूवर धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. त्यात पिंटू शिर्केचा मृत्यू झाला होता.