नागपूर: रेशीमबाग येथील मैदानावर राष्ट्रीय संवयेसवक संघाच्या तृतीय संघ शिक्षा वर्गाच्या समारोप झाला. यावेळी मार्गदर्शन करताना राष्ट्रिय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले की, ज्ञानवापीचा इतिहास आम्ही बदलवू शकत नाही. त्यावर वाद निर्माण केले जात आहेत रोज नवनवे पुरावे सादर केले जात आहे. मात्र, आम्हाला अयोध्येतील राम मंदिरनंतर आता आंदोलन करायचे नाही.
Mohan Bhagwat on Gyanvapi : राममंदिरा नंतर आता आम्हाला आंदोलन करायचे नाही - मोहन भागवत
ज्ञानवापीचा इतिहास (History of Gyanvapi) आम्ही बदलवू शकत नाही. त्यावर वाद निर्माण केले जात आहेत रोज नवनवे पुरावे सादर केले जात आहे. मात्र, आम्हाला अयोध्येतील राम मंदिरनंतर (after Ram Mandir) आता आंदोलन करायचे नाही (We dont want to agitate) अशी भुमिका राष्ट्रिय स्वयंसेवक संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh) सरसंघचालक मोहन भागवत (Sarsanghchalak Mohan Bhagwat) यांनी स्पष्ट केली आहे.
ज्ञानवापी बद्दल बोलताना त्यांनी सांगितलेकी इतिहास आम्ही बदलवू शकत नाही, सर्वांनीच आपआपसात समन्वय ठेवत सर्वसंमतीने आणि न्यायालयाचा सन्मान राखत मार्ग काढायला हवा. पण सध्या देशात भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. इस्लाम आक्रमकांच्या माध्यमातून भारतात आला, तेव्हा भारताचे स्वातंत्र्य हवे असलेल्या लोकांचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी हजारो देवस्थाने उद्ध्वस्त करण्यात आली. हिंदू कोणत्याही मुस्लिमांच्या विरोधात नाही, तर मंदिरांचे पुनरुज्जीवन व्हावे असे हिंदूना वाटते.
'हिंदू मुस्लिमांच्या विरोधात विचार करत नाहीत. आजच्या मुस्लिमांचे पूर्वजही हिंदूच होते. आम्ही ९ नोव्हेंबरला सांगितले की रामजन्मभूमी आंदोलन आहे, त्यात आम्ही सहभागी झालो. ते काम आम्ही पूर्ण केले. आता आपल्याला आंदोलनांची गरज नाही. पण मनात काही प्रश्न निर्माण होतात. ते कोणाच्या विरोधात नाहीत. मुस्लिमांनी ते त्यांच्या विरुद्ध आहेत असे मानू नये, हिंदूंनीही तसे मानू नये. असे काही असेल तर एकत्र बसून सहमतीने मार्ग काढा. पण प्रत्येक वेळी तसे होत नसेल, आणि तुम्ही कोर्टात गेलात, तर जो कोर्ट निकाल देईल तो पाळायला हवा असेही त्यांनी स्पष्ट केले.