महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर : देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील हा विश्वास आम्हाला होता - संदीप जोशी - Maharashtra political crisis

देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील हा विश्वास आम्हाला होता, अशी भावना नागपूरचे नवनिर्वाचित महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केली आहे.

नागपूर : देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील हा विश्वास आम्हाला होता - संदीप जोशी

By

Published : Nov 23, 2019, 2:59 PM IST

नागपूर -देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील हा विश्वास आम्हाला होता, अशी भावना नागपूरचे नवनिर्वाचित महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केली आहे. राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार येण्याची चिन्हे असताना शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

नागपूर : देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील हा विश्वास आम्हाला होता - संदीप जोशी

हेही वाचा -कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा - जितेंद्र आव्हाड

फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्याचा आनंद व्यक्त करत मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात जल्लोष करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील राजकारणातील मोठे नाव म्हणून पुढे आले आहे. आम्हाला विश्वास होता तो मुख्यमंत्र्यांनी पूर्ण करून दाखविला, असे मत मुख्यमंत्र्यांचे विश्वासू आणि नागपूरचे महापौर संदीप जोशींनी व्यक्त केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details